दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक पदाची निवडणूक महत्त्वाची : सुजात आंबेडकर

बृज बिहारी दुबे
By -


 रिपोर्ट अतुल काळे 


सांगली /तासगाव : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या महत्त्वाच्या निवडणुका असतात पण या वरच्या लोकांच्या निवडणुका असतात. आपल्याला काम करणारी लोक हवेत. आपल्या सोबत उठ बस करणारी लोक हवीत. आपल्यावर संकट आल्यास आपल्या सोबत उभी असणारी लोक हवीत. नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्तीची ही निवडणूक असते म्हणून नगरसेवक पदाची निवडणूक महत्त्वाची आहे. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, अशी हाक प्रमोटिव्ह स्पीकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजात आंबेडकर यांनी तासगावकर जनतेला दिली. नगरपरिषद निवडणूक जाहीर प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

    यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ साळुंखे, माजी खासदार संजयकाका पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील, वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडी कडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ.विजया बाबासो पाटील तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. 

     सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीने खुले आरक्षण असताना बौद्ध व कासार समाजातील उमेदवार उभे केले. याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही. यामधे जातीय एकोपा दिसून येतो आणि हा एकोपा राखण्याचे काम संजयकाका पाटील यांनी केले आहे. नगरसेवक पदाची निवडणूक ही नागरिकांसाठी महत्त्वाची निवडणूक आहे. आपल्याला मदत मदत करणाऱ्या व्यक्तीची ही निवडणूक म्हणून ही महत्त्वाची आहे. रस्ते, वीज, पाणी आणि दैनंदिन सोई सुविधा देणाऱ्या उमेदवाराला आपण मत द्यायला हवं. कामासाठी निधी खेचून आणणारी व्यक्ती हवी. मक्तेदारी, दबावशाही, दादागिरीच्या प्रवाहातून बाहेर पडून लोकांसाठी काम करणाऱ्या, विकास योजना उभ्या करणाऱ्या, लोकांसाठी धावून येणाऱ्या वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडी च्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

     राज्यातील राजकारणात नक्की काय चाललंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोण कोणा बरोबर युती करेल हे ठाऊक नाही. एकनाथ शिंदे नाराज आहेत, कारण भाजप त्यांचा पक्ष फोडतोय. एका ठिकाणी काँग्रेसने भाजपशी युती केली, आटपाडीमध्ये शिंदे गटाने राष्ट्रवादीशी युती केली. अशा परिस्थितीत लोक स्वतःची सत्ता कशी टिकते आणि त्यातून पैसा कसा कमावता येईल, कार्यकर्त्यांना ठेकेदारी कशी देता येईल यामध्ये राजकारण उभा केला आहे. असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 


100 नगरसेवक जिंकून आले ही लोकशाहीसाठी खतऱ्याची घंटी


निवडणूक निकाला आधीच भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले ही लोकशाहीसाठी खतऱ्याची घंटी आहे. दबाव टाकून अर्ज मागे घेतले, छाननी मध्ये अर्ज बाद झाले, काही जणांकडे कागदपत्रे नव्हती म्हणून अर्ज बाद झाले. हा लोकशाहीला धोका आहे. असे सुजात आंबेडकर म्हणाले. 

    यावेळी संजयकाका पाटील म्हणाले,  प्रतिकूल परिस्थितीमध्ये, संघर्षाच्या परिस्थितीमध्ये तासगाव शहराने मला साथ दिली. दोन ते तीन टर्म नगरपरिषदेची सत्ता आपल्याकडे सोपवली. सरकारच्या माध्यमातून निधी आणून प्रामाणिकपणे विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. शहरातून जाणाऱ्या विटामाई शाळा रस्त्याचे लवकरच टेंडर निघून कामकाजास सुरुवात होईल. तालुक्यात बोर्ड बाजूतून होणाऱ्या श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन तालुक्यातील शेतकरी जनता अडचणीत आहेत त्यांना कर्जमाफीचे दिलेलं आश्वासन सरकारकडून लवकर पूर्ण करावं यासाठी आग्रह धरला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट आल आहे. पैसे वाल्यांची निवडणूक झाली असताना नगरसेवक पदासाठी आम्ही सेंट्रींग करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली. स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार पहिले तर जे समाजासाठी काही करू इच्छितात त्या सगळ्यांना संधी देण्याचं काम केलं आहे. उमेदवार पहा, कोण कामाचे आहेत, कोणाचे काय धंदे आहेत हे सगळं ओळखा असा टोला त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला. शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

     यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया पाटील म्हणाल्या, संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामे करून तासगाव नगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम गेल्या दहा वर्षात सुरू आहे. तासगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम एकत्र घेऊन सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश काकांनी दिला. तासगाव शहरात नगरपालिकेची नूतन प्रशासकीय इमारत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगरपालिका शाळांचे आधुनिकीकरण, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, बालोद्यान, खाऊगल्ली, भाऊ गणपती कोळी मल्टीपर्पज हॉल, शहरातील चौक सुशोभीकरण अशा कामातून शहराचे रूपडे पालटण्याचे काम संजयकाकांच्या माध्यमातून झाले आहे आणि ते यापुढेही चालू राहील. शहराचा सर्वांगीण विकास करण्याच व्रत आम्ही सर्व उमेदवार घेत आहोत. आपली सेवा करण्याची संधी देण्याची मागणी आम्ही करत आहोत. असे विजया पाटील म्हणाल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!