ठाणे, कोकण विभाग दि.१४/११/२०२५ मराठी कामगार सेनेचे उपाध्यक्ष (निरीक्षक मुंबई, ठाणे, रायगड)श्री. दत्ता भाऊ पुजारी यांनी कोकण विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या ठाणे येथील दालनात भेट देऊन नवी मुंबई परिसरातील खाद्य पदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील कथित गैरप्रकारांबाबत तक्रारी व मुद्दे मांडले.
या भेटीदरम्यान तेल, पनीर, दूध व इतर अन्न उत्पादनांमध्ये होत असल्याचा आरोप असलेल्या अनियमितता याबाबत सविस्तर चर्चा झाली. संबंधित बैठकीदरम्यान झालेल्या वादविवादाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचेही निदर्शनास आले.
श्रीकांत कडकडे यांना वारंवार भेटून सांगून पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांनी जाणून-बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. श्री. दत्ता भाऊ पुजारी यांनी विभागाकडून १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास कार्यालय फोडण्याचा ईशारा देण्यात आला आहे
या भेटीस जयरिंग पाटील – उपाध्यक्ष, मराठी कामगार सेना, तसेच दिपक बदक आणि सचिन टेकवडे हे उपस्थित होते.
अन्नसुरक्षा आणि संबंधित विभागीय कार्यवाहीबाबत जनतेत पारदर्शकता राहावी, यासाठी ही तक्रार औपचारिकपणे नोंदविण्यात आल्याचे मराठी कामगार सेनेने स्पष्ट केले आहे.
