उमेदवारांना चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण, 2 डिसेंबर रोजी होणार मतदान अतुल पाटोळे

बृज बिहारी दुबे
By -


तासगाव : तासगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष कार्यक्रमानुसार बुधवार दि.26/11/2025 रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले असून तासगाव नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 1 ते 12 साठी ही निवडणूक होणार आहे. सदर निवडणूकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकूण 88 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. अशी माहिती तासगावचे तहसीलदार तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी अतुल पाटोळे यांनी दिली.

        नगरपरिषद निवडणूकीसाठी शहरात 36 मतदान केंद्रे आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार तासगाव यांच्याकडून निवडणुकीचा कामकाज पार पाडण्यासाठी आचारसंहिता पथक, एक खिडकी कक्ष, मदत कक्ष, 6 स्थिर सव्र्व्हेक्षण पथके, 3 व्हिडिओ सर्विलन्स पथक व 3 भरारी पथक, 7 क्षेत्रीय अधिकारी (ZO) इत्यादींची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात जिजामाता चौक, पीडीव्हीपी कॉलेज चौक व विटा नाका येथे स्थिर सर्व्हेक्षण पथके उभारण्यात आली आहेत. तसेच 12 प्रभागांसाठी एकूण 36 तर प्रभागनिहाय 1 ईव्हीएम मशिन राखीव ठेवण्यात आली आहे.

    तक्रारींचे निराकरण करणेसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून त्यासाठी संपर्क क्रमांक 02346 - 240143 ठेवण्यात आलेला आहे. तरी नागरीकांना कोणत्याही तक्रारी असल्यास या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवता येतील. मतदारांना त्यांचे मतदान केंद्र mahasecvoterlist.in या संकेत स्थळावर शोधता येईल. यासंबंधीचे माहिती फलक शहरात लावणेत आले असून नगरपरिषद कार्यालयात 02346 - 240125 या हेल्पलाईनवर संपर्क साधून मतदारांना मतदान केंद्राची माहिती घेता येऊ शकेल अशी माहिती सहायक निर्वाचन अधिकारी श्री. सुधाकर लेंडवे, मुख्याधिकारी तासगाव नगरपरिषद यांनी दिली.

     मा. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वसुंधरा बारवे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. उपायुक्त बारवे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत.

     मतदान दि. 02 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 5.30 या वेळेत होणार असून तासगाव शहरातील सर्व मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!