रिपोर्ट अतुल काळे
सांगली/तासगाव : सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव संकुलातील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर व विनायक ऊर्फ बाबासाहेब पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव येथे
26 नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात संपन्न झाला. तासगाव येथील ॲड. अनिल माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक पठण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला. ॲड. माने यांनी संविधानाने मानव समाजाला दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
पटवर्धन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.निता जोशी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिरचे संस्कृत शिक्षक नितीन जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थितांचे आभार सौ.इंगळे यांनी मानले. याप्रसंगी तासगाव संकुलातील दोनही शाळांचे विद्यार्थी -विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
