(रिपोर्ट किशोर लोंढे)
वर्षानुवर्षे रिक्षा चालक मालकांसोबत होणारा अन्याय तसेच सरकारकडून कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही रिक्षावाल्यांचे जगणे अत्यंत मुश्किल झालेले आहे तरी देखील यावर सरकारचे लक्ष नाही.
रिक्षा चालक-मालक हे शासनाचा भरपूर मोठा कामाचा वाटा उचलतात लोकांना दवाखाना पोलीस स्टेशन एअरपोर्ट त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचवतात.
तसेच शासनाच्या माध्यमातून बाईक टॅक्सीला परवानगी.
बाटलापासूनचे दर 700 ते 800 वरून 2800 ते 3000 रुपये करण्यात आले. लाखों रुपये रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंड आकारण्यात आलेला आहे. कल्याणकारी योजनेच्या नावाखाली रिक्षाचालकांची होणारी लूट तसेच गृहप्रकल्पामध्ये रिक्षा चालकांना घर मिळण्यासाठी. ६ ऑक्टोंबर रोजी आंदोलन व एक दिवशी उपोषण करण्यात येणार होते परंतु पोलिसांनी विनंती केल्यामुळे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळाचे उद्घाटनासाठी येणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता रिक्षा चालक मला संघटनेच्या वतीने आंदोलन एक दिवशी लाक्षणिक उपोषण कोकण भवन येथे करण्यात येणार आहे.
अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष कासमभाई मुलाणी व रिक्षा चालक-मालक संघटना वाशी संस्थापक सुनील बोर्डे यांनी दिली.
या आंदोलनाला व लाक्षणिक उपोषणाला भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल च्या वतीने सुद्धा पाठिंबा राहील अशी माहिती किशोर लोंढे यांनी दिली.
रिक्षा चालक-मालकांवर होणारा अन्याय अत्याचार याबाबत तोडगा काढण्यासाठी आंदोलन व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण हा मार्ग स्वीकारला अशी माहिती अध्यक्ष कमलाकर ठाकूर व अविनाश जाधव यांनी दिली.
