१० ऑक्टोबर २०२५ रोजी नवी मुंबई, पनवेल, उरण येथील रिक्षा चालक-मालक संघटनांचा कोकण भवन येथे धडक मोर्चा संपन्न

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट किशोर लोंढे)
दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कोकण भवन नवी मुंबई, येथे नवी मुंबई, पनवेल, उरण सर्व रिक्षा संघटना मिळून धडक मोर्चा व एक दिवशी लाक्षणिक उपोषण करणार आले.
वर्षानुवर्षे होणारी रिक्षा चालक व मालकांची पिळवणूक तसेच सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत व सहकार्य मिळत नसल्याने व दिवसेंदिवस रिक्षावाल्यांवर ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या कंपन्यांमुळे वाईट दिवस निर्माण झालेले आहेत. याच्या विरोधात दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कोकण भवन या ठिकाणी धडक मोर्चा पोहोचला.
35 वर्षापासून रिक्षा चालक-मालक संघटनेत संघटनेचे नेतृत्व करणारे कासमभाई मुलांनी, सुनील भाई बोर्डे, नंदू पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.
तसेच या मोर्चामध्ये नवीन असे तयार झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई पनवेल व उरण या ठिकाणा वरील समस्त रिक्षा चालक-मालक संघटनांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला व शासनाच्या व परिवहन शासनाचा तीव्र असा विरोध करण्यात आला.
नवी मुंबईचे नेते श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहुन आपला पाठिंबा दिला व रिक्षा चालक-मालकांन सोबत होणार्या अन्याया बाबत सरकारच्या विरोधात ही भुमिका घेण्याची तयारी असल्याचे सांगितले.
श्रीमती फरोग मुकादम अपर आयुक्त कोकण विभाग यांनी मागण्यांचे पत्रक घेऊन १५ दिवसांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे क्षिष्ट मंडळाला आश्वासन दिले.
बेलापूर गोपनीय पोलिस अधिकारी यांनी कोकण भवन याठिकाणी क्षिष्ट मंडळाला आपल्या पदाचा, दिशाभूल व थापा मारण्याचा प्रयत्न केला परंतु आदर्श न्युज व किशोर लोंढे यांनी ठणकावून सांगितल्यावर त्यांनी शांतता घेतली. तसेच यांची तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार साहेब यांना देखील करण्यात येईल अशी माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी अधिकृत पत्र व लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार व शासनाला थोडा वेळ द्यावा अशी मागणी केल्याने सर्व उपोषण करत्यानी उपोषण सोडले.
सक्रीय सहभागी होऊन धडक मोर्चा व एकदिवसीय लाक्षणिक उपोषण १००% यशस्वी करण्यासाठी भरपूर परिश्रम व मेहनत घेणारे नवी मुंबई रिक्षा चालक-मालक संघटना जिल्हाध्यक्ष सुरेशभाई काळे.
छत्रपती शिवाजी राजे चालक मालक संघ नवी मुंबई सल्लागार मधुकर पाटील.
रिक्षा चालक-मालक संघटना सानपाडा अध्यक्ष संतोष जाधव.
रिक्षा चालक-मालक संघटना खारघर अध्यक्ष कमलाकर ठाकूर.
खांदेश्वर रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष
सिबीडी बेलापूर रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष विष्णूभाई दिघे.
नवी मुंबई रिक्षा चालक-मालक संघटना वाशी अध्यक्ष अविनाश कदम.
नवी मुंबई रिक्षा चालक-मालक संघटना वाशी उपाध्यक्ष दिपक निगडे.
रिक्षा चालक-मालक संघटना वाशी कार्याध्यक्ष विजय कडवेकर.
नवी मुंबई रिक्षा चालक-मालक महासंघ पदाधिकारी नागेंद्रभाई यादव.
रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष सुजित खोड.
रिक्षा चालक-मालक संघटना कोपरखैरणे अध्यक्ष नितीन महिंद.
रिक्षा चालक-मालक संघटना तुर्भे अध्यक्ष शंकर शिवशरण.
रिक्षा चालक-मालक संघटना तुर्भे अध्यक्ष मारुती कोकणे.
रिक्षा चालक-मालक संघटना तुर्भे अध्यक्ष संतोष पिसाळ.
रिक्षा चालक-मालक संघटना वाशी अध्यक्ष रमेश जोगदंड.
रिक्षा चालक-मालक संघटना वाशी अध्यक्ष किसन सोनी.
रिक्षा चालक-मालक संघटना उलवानोड अध्यक्ष कैलास देशमुख.
रिक्षा चालक-मालक संघटना पदाधिकारी राजु कडलक.
सुनिता अहिरे, सुधाकर ढोले, अप्पाराव माने, सोनी भाई, अजय जैस्वाल,अतुल शिंदे, गणेश निकम, सर्जेराव बिरामणे.
भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल अध्यक्ष विजय साळवे, सचिव दत्तात्रय दिलाने उपस्थित होते.
तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटना रोडपाली व इतर ही रिक्षा चालक-मालक संघटनांनी पाठिंबा दिला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!