रिपोर्ट किशोर लोढे
पुण्यातील मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्यावरील जातीय आणि अन्यायकारक वर्तनाविरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आणि प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्यावर जातीय भेदभावपूर्ण आणि अन्यायकारक वर्तन करण्यात आले, हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, संबंधित प्रशासन आणि ट्रस्ट सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या :
१. प्रेम बिऱ्हाडे यांना तात्काळ न्याय मिळावा.
२. मॉडर्न कॉलेज प्रशासन व संबंधित ट्रस्टींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
३. शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव थांबवण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.
या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयासमोर प्रशासनाच्या जातीय वर्तनाविरोधात तीव्र आंदोलन केले.
