चक्काजाम आंदोलनकर्ते संजयकाकाच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेश भंग केल्याचा ठपका शेतकऱ्यात नाराजी

बृज बिहारी दुबे
By -

रिपोर्ट अतुल काळे 

सांगली/तासगाव : अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या  शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी तासगावच्या रस्त्यावर उतरलेले माजी खासदार संजयकाका पाटील, प्रभाकर बाबा पाटील यांच्यासह एकूण ११ जणांवर तासगाव पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून 'चक्काजाम' आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी सांगली यांच्या बंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

    मंगळवार दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० ते ११:३० वाजेच्या दरम्यान तासगाव येथील एसटी स्टँड चौकात ११ आरोपींनी एकत्र येत 'चक्काजाम' आंदोलन केले. हा जमाव बेकायदेशीर होता. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत हे आंदोलन करण्यात आले. असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस शिपाई शहाजी तानाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून तासगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या ११ आरोपींमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील, युवा नेते प्रभाकरबाबा पाटील (दोघे रा. चिंचणी) यांच्यासह परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती . प्रमोदआप्पा शेंडगे (पेड), तासगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते आर.डी. आप्पा उर्फ रविंद्र पाटील (निमणी), तासगावचे  माजी नगराध्यक्ष  बाबासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष  जाफर मुजावर, श. सुदीप खराडे, तासगावचे माजी नगरसेवक  माणीकराव जाधव, श्री. हेमंत उर्फ हणमंत पाटील (सर्व रा. तासगाव), महेशदादा पाटील (कुमठे) आणि कृष्णा पाटील (लिंब) यांचा समावेश आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि पाटील हे करत असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!