पर्यावरण सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील नियमबाह्य जाहिराती फलक तात्काळ हटवण्याबाबत

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट दिपक निगडे) 


मुंबईसह राज्यात जाहिराती फलकांवर अनेक निर्बंध येणार असून जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या जाहिरातीचा फलक लावता येणार आहे या अनुषंगाने नवी मुंबईतील मेन ठिकाणी लावण्यात आलेले फलक नवी मुंबईची रोशनाई वाढवत आहेत असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. निर्देशानुसार मनपा अतिक्रमण विभागामार्फत या मोठ्या आकाराच्या फलकांना त्वरित हटवावे अशी यावेळेस पर्यावरण सेवाभावी संस्था संघटनेतर्फे मागणी करण्यात आली

      इमारतीची गच्ची, आवाराची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबत सर्व महापालिका मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्रधिकरण यासह विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी एका महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत यानुसार कारवाई करण्यात यावी 

 आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल आम्हाला प्राप्त करून द्यावा आपण योग्य ती कारवाई केल्यास आपला सन्मान केला जाईल आणि कारवाई करण्यास कचुराई केल्यास नियमबाह्य जाहिरात फलकावर चढून आपला विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा पर्यावरण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी यावेळी दिला. त्यांच्यासोबत नवी मुंबई शहर अध्यक्ष पर्यावरण सेवाभावी संस्था विनोद शिंदे,शैलेश पांजगे शहर सचिव,राहुल रोडे  शहर सहसचिव,समी गुप्ता उपशहर अध्यक्ष ,संतोष भराडे, संदेश खांबे शहर सचिव, प्रथमेश गायकरआणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न पर्यावरण सेवा भावी संस्था इत्यादी यावेळेस उपस्थित होते आणि असा इशारा नवी मुंबई पर्यावरण शहर अध्यक्ष विनोद शिंदे यांनी दिला आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!