(रिपोर्ट किशोर लोंढे)
रिक्षा चालक मालकांचे होणारे नुकसान व अन्याया विरुद्धात वाच्या फोडण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२५ नवी मुंबई, उरण, पनवेल यांच्या वतीने कोकण भवन येथे धडक मोर्चा घेण्यात येणार आहे.
महासंघाचे अध्यक्ष कासंमभाई मुलांनी, वाशी रिक्षा चालक मालक संघटना संस्थापक सुनील बोर्ड, आगरी कोळी संघटना नंदु पाटील, नवी मुंबई उत्तर भारतीय संघटना नागेंद्र यादव यांनी मार्गदर्शन केले.
तसेच या बैठकीचे आयोजन नवी मुंबई रिक्षाचालक मालक संघटनाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश काळे यांनी केले होते.
आप्पाराव माने, नामदेव लंगोटे, अमजद शेख, मारुती कोकणे, संतोष पिसाळ, सुनील माने, लक्ष्मण सोळंके व इतर ही रिक्षाचालक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
