सांगली/तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्रवासी व नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार रोहित पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांबाबत मुंबई येथे पाठपुरावा केला. त्यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुसेकर यांची भेट घेऊन विविध प्रलंबित व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेतला. बसस्थानकांची दुरुस्ती व देखभाल, प्रवाशांसाठी मूलभूत सोयी-सुविधा, नव्या बसेसची गरज, तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी यावर चर्चा झाली. ग्रामीण भागातील लोकांचे दैनंदिन जीवन एस.टी.वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने प्रवाशांच्या समस्या तातडीने सोडवणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
या चर्चेनंतर महामंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावांचा लवकरात लवकर विचार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
रिपोर्ट अतुल काळे
