(रिपोर्ट अतुल काळे )
सांगली/तासगाव : येथील अमृतेश्वर नगर मधील महात्मा ज्योतिबा फुले विद्यामंदिर या नगरपरिषद शाळेस 'हॅपी स्कूल' बनविण्यासाठी इनरव्हील क्लब तर्फे शाळेला क्रीडा साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके, हात धुण्यासाठी वॉश बेसिन, शाळेची रंगरंगोटी, चप्पल स्टॅन्ड, ग्रंथालयासाठी कपाट, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर, पोषण आहाराचे धान्य ठेवण्यासाठी दोन डबे, सॅनेटरी किटचे वाटप करण्यात आले.
स्वच्छतागृहाची दुरुस्ती, तसेच, खिडक्यांच्या फुटलेल्या काचा बसवून देण्यात आल्या. प्रसंगी, शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी, पीडीसी नंदा झाडबुके यांनी आपल्या मनोगतातून या शाळेला 'हॅपी स्कुल' म्हणून घोषित करत शाळेबद्दल भावना व्यक्त केल्या.
यावेळी, स्वागत मुख्याध्यापक दगडू शेंडगे यांनी तर सूत्रसंचालन इनरव्हील क्लबच्या चार्टर मेंबर योगिनी नाईक यांनी केले. क्लबच्या अध्यक्षा रूपाली मिरजकर, सचिव रिद्धी नाईक, सदस्या वंदना घनेरे, प्रमोदिनी विटेकर, प्रिया जाधव, शैलजा पवार, उज्वला पेटकर, वंदना पाटील, विनया पाटील, मीनाक्षी जाधव उपस्थित होत्या. उपक्रमाचे आभार सीपीसीसी स्मिता औताडे यांनी आभार व्यक्त केले.
