इनरव्हील क्लबकडून 'आदर्श शिक्षक' पुरस्कार

बृज बिहारी दुबे
By -
    (रिपोर्ट अतुल काळे )

सांगली/तासगाव : इनरव्हील क्लब ऑफ तासगाव मार्फत दरवर्षी देण्यात येणारा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला जातो. इनरव्हील क्लबच्या डीपीसीसी नंदा झाडबुके यांच्या हस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला. नगरपरिषद शाळेतील शिक्षक प्रतापसिंग गावित, संजय हजारे, मसूद पटेल, सुनीता पाटील, कल्याणी काळे, भागवत कोळेकर, मनीषा जाधव, शारदा उघडे, सुवर्णा लुगडे यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देण्यात आला.
    याप्रसंगी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली मिरजकर, सचिव रिद्धी नाईक, सीपीसीसी स्मिता औताडे आदी सदस्या व पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!