किरण पाटील यांना पितृशोक

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट अतुल काले)

सांगली/ तासगाव : ढवळी (ता. तासगाव ) येथील पंडितराव विठोबा पाटील (वय 70) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सिद्धेश्वर रोड, तासगाव येथील नोबल ज्वेलर्सचे प्रमोद पाटील, किरण पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निधन वृत्त समजताच सिद्धेश्वर रोडवरील व्यापाऱ्यांनी आस्थापने बंद ठेवली. तासगाव सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, पाटील कुटुंबीयांचे नातेवाईक, ग्रामस्थ, यांच्या उपस्थितीत ढवळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सकाळी 9 वाजता ढवळी येथे रक्षा विसर्जन होणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!