शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला.

बृज बिहारी दुबे
By -
छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी, नवी मुंबई येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला काही महिने उलटले असताना देखील मोदी शहा सरकारने पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा 'खेळ' सुरू केला आहे. पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात आज नवी मुंबई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन करत निषेध केला.
पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा यावेळी संतप्त नवी मुंबईकरांनी दिल्या. देशभरात जनभावना तीव्र असताना क्रिकेट सामना भरवून शहिदांचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सिंधूर पाठवून पहलगाम च्या भ्याड हल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली.

शिवसेना नवी मुंबईच्या वतीने माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. या क्रिकेट सामन्याच्या विरोधात देशभरात जनभावना तीव्र आहेत. या जनभावनेला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून वाचा फोडली. शिवसेनेच्या रणरागिणीनी घराघरातून सिंधूर जमा करून पाठवण्यात आले.

शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
बेलापूर विधानसभा जिल्हा प्रमुख मा.श्री.प्रकाश दादा पाटील साहेब
ऐरोली विधानसभा चे मा.प्रविण दादा म्हात्रे
सौ.रंजनाताई शिंत्रे जिल्हा संघटक 

सर्व उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हा संघटक, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, समन्वयक, उपसमन्वयक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना, युवती सेना व इतर संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते



रिपोर्ट किशोर लोंढे 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!