वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

बृज बिहारी दुबे
By -

सांगली /तासगाव : "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार" या ब्रीद वाक्याने ज्ञान प्रसार करणाऱ्या श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील ५ प्राध्यापक, १२ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले व पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी झालेले विद्यार्थी,प्रा आण्णासाहेब बागल (मराठी),प्रा.प्रणया पाटील (इंग्रजी),प्रा.प्रणाली पाटील (गणित), प्रा.डॉ.अश्विनी देशिंगे (हिंदी), प्रा.सुजाता माळी,राहुल गलांडे,विजया राजमाने,सुकन्या मोहिते,हिम्मत गुरव (रसायनशास्त्र),स्नेहल जानकर,आकांक्षा पाटील, प्रवीण पुजारी, गणेश सातपुते,अजिंक्य करांडे,विश्वजीत पाटील (संख्याशास्त्र),अजित चव्हाण (वनस्पतीशास्त्र)या सर्व यशवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव व डॉ.नरेंद्र कुलकर्णी,नॅक समन्वयक डॉ.जीवन घोडके, ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील,विज्ञान विभाग प्रमुख पी.डी.पाटील यांसह महाविद्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



रिपोर्ट अतुल काळे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!