सांगली /तासगाव : स्वातंत्र्य सैनिक वारसदार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला क्रांती मोर्चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण करून 3 सप्टेंबर 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीची आठवण करून देण्यात आली. तासगाव तहसील वर तिरंगा फडकविण्यात आला. या उठावाची इतिहासात नोंद करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सेनानी यांनी या चळवळीमध्ये भाग घेतला होता. याच दिवसाची आठवण जपत क्रांती मोर्चा वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर लेडवे,मंडल कृषी अधिकारी जाधव मॅडम, ग्रामविकास अधिकारी (तलाठी) अढारी यांच्या हस्ते स्मृतीस्तंभाला हार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा वासुदेव गुरव यांनी केले. मनोगत व्यक्त करताना प्रा डॉ बाबुराव गुरव म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती स्तंभाची दुरावस्था आणि त्याविषयी प्रबोधन यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात यावी. विस्मरणात गेलेल्या तासगावच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महत्वाची भुमिका ही समिती पार पाडेल अशी अपेक्षा श्री. गुरव यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रसंगी अशोक पोरे, जयसिंगराव सावंत, महावीर कोथळे तसेच भिमराव भंडारे,आर एन माळी, आयुब मणेर,भास्कर सदाकळे, पांडुरंग जाधव, नुतन परिट, अमर खोत, विद्यानिकेतन प्रशालेचे शहाजी खरमाटे, विद्यार्थी - विद्यार्थिनी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट अतुल काळे