अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप रोज जे काही नवे फतवे काढतायत त्याला मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी ट्रम्पला दिलेले उत्तर.
काही म्हणा,ठणठणीत आणि स्पष्ट आवाजात 'जशास तसे'उत्तर देण्यात बायका हुशारच असतात.
ट्रंपसाहेब, तुम्ही आपल्यामध्ये भिंत उभी करताय, पण लक्षात ठेवा. या भिंतीच्या पलीकडे ७ अब्ज लोक उभे आहेत. हे लोक आपले आयफोन खाली ठेवून सॅमसंग किंवा हुवावे हातात घेऊ शकतात. ते फोर्ड आणि शेव्ह्रलेटऐवजी टोयोटा, किआ किंवा होंडाची गाडी निवडू शकतात. ते डिस्नेऐवजी इतर अनेक चित्रपट पाहू शकतात, आणि नायकीच्या जागी मेक्सिकोच्या पॅनाम कंपनीचे बूट घालू शकतात.
जर हे ७ अब्ज ग्राहक अमेरिकन उत्पादने खरेदी करणे थांबवतील, तर तुमची अर्थव्यवस्था त्या भिंतीच्या आत कोसळेल.आणि मग तुम्हीच येऊन म्हणाल. कृपा करून ही भिंत पाडा. आम्हाला तसं व्हावं असं नाही वाटत, पण भिंत तुम्हीच मागितली, त्यामुळे आता भिंतच तुम्हाला मिळेल.
फक्त लक्षात ठेवा. जग खूप मोठं आहे, अमेरिका म्हणजेच सर्व काही नाही. स्वतःच्या इच्छाशक्तीची ताकद हेच सर्वात मोठी शस्त्र आहे.
