(रिपोर्ट दिपक निगडे)
नवी मुंबई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निलेश वाघमारे हा इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांना गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळाली होती त्यानुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध पोलीस पदके तयार करून आमले पदार्थ विक्री करण्यासाठी येणाऱ्या आरोपींचा शोध सुरू होता, कोपरखैरणे पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सापळा लावला होता घनसोली स्टेशन समोरील सेंटर पार्क गार्डन जवळ एका इसमाच्या हालचालीवरून पोलिसांना त्याचा संशय आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता या इसमाकडे ४४ लाख रुपये किमतीचा ११२. ३८ ग्राम वजनाचा पांढऱ्या रंगाचा पारदर्शक स्फटिकासारखे एमडी मेफेड्रोन पावडर आढळून आलेली आहे या आरोपीचे नाव निखिल राजकुमार वाघासे वय ३२ वर्ष काम कंट्रक्शन रा. कासारिओ गोल्ड, रूम नंबर ५०६, विक्टोरिया सी विंग, पलावा डोंबिवली ईस्ट असे आहे. त्याचा साथीदार मसूद अब्दुल सलाम खान वय ४० वर्षे, धंदा सुपरवायझर रा. रूम नंबर २०१, बी विंग मकदूम मंजिल रशीद कंपाउंन्ड, कौसा मुंब्रा. मूळ राहणार ग्राम औराई,पोस्ट भटनी दालन, जि. कुशीनगर याची पोलिसांनी अंग झडती घेतली असता २८ लाख किमतीची ६९. ७४ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाचे पारदर्शक स्फटिका सारखे कण असलेले एमडी (मेफेड्रोन) पावडर मिळून आली सदर प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाणे गु. रजि. क्र. ७७६/२०२५ एन.डी.पी.एस.ऍक्ट १९८५ चे कलम ८ (क). २२ (क). २९ अन्वये दिनांक १९/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत सदर गुन्ह्याचा कोपरखैरणे पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत या दोन्ही आरोपींकडून एकूण रुपये ७२, ००, ०००/-रु. किमतीचा १८२. १२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले रुपये १३ लाख ५० हजार किमतीची किया सोनेट मोटर कार वाहन विक्री करण्याकरिता त्यांच्याकडे मिळून आलेल्या पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवी व इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण रुपये ८५लाख ५० हजार ६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कोपरखैरणे पोलिसांनी हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहेकोट – एवढया मोठया किमतीचे एमडी सारखे अमली पदार्थ विक्रीसाठी कार्यरत असणारी टोळी कार्यरत आहे हे जरी खरं असेल तरी इतक्या किमतीचा माल नेमकी कोण खरेदी करतो याचा देखील तपास होणे गरजेचे आहे त्यानुसार हे अमली पदार्थ खरेदी करणारा कोण अक्का आहे त्याच्यावर देखील कारवाई पोलिसांनी केली पाहिजे
भारत जैन, स्वराज्य शक्ती सेना अध्यक्ष नवी मुंबई.
दरम्यान:- सदरची कारवाई पंकज डहाणे पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ वाशी मा. श्री. राहुल धस, सहा, पोलीस आयुक्त रबाले विभाग, कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा, पोलीस निरीक्षक श्री अभिजीत मोरे पोहावा /१०५४ सुनील चिकणे, पोहावा/११९३, श्री हनुमंत किरवे पोशि/३२१३ श्री मुकिंदा सोनलकर, पोशि/१२४६४ श्री मनोहर जाधव, पोशि/१२०२८ श्री राहुल डोंबाळे, पोशि/१२३४३ श्री निलेश निकम यांनी केलेली
