युवतीशी शाब्दिक छेडछाड; युवकाची चौकातच धुलाई

बृज बिहारी दुबे
By -

       (  रिपोर्ट अतुल काळे )

सांगली /तासगाव : मेडिकल स्टोअर मध्ये असणाऱ्या कर्मचारी युवतीला झालेल्या शाब्दिक छेडछाडी मधून युवकाला चांगलाच प्रसाद मिळाला असल्याची घटना मंगळवारी सकाळी वंदे मातरम चौक तासगाव येथे घडली.
    याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वंदे मातरम चौक येथे दोन नामांकित मेडिकल स्टोअर्स आहेत. दोन दिवसांपूर्वी मेडिकल मधील संबंधित युवतीला तरुणाकडून शाब्दिक छेडछाड करण्यात आली. संबंधित तरुण हा समोरच असणाऱ्या दुसऱ्या मेडिकलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहे. झालेला प्रकार युवतीने आपल्या भावास सांगितला. भावाने चिंचणी येथील मित्रमंडळी गोळा करून मंगळवारी सकाळी युवकाची यथेच्छ धुलाई केली. ही घटना सकाळी 9: 50 च्या सुमारास घडली. 

    कर्मचारी असलेल्या मेडिकल स्टोअर व्यवस्थापनाने संबंधित युवकाची हकालपट्टी केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वंदे मातरम चौकातच युवकाची धुलाई होत असताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने युवकाला होणारी पुढील मारहाण थांबली आणि युवक दुचाकीवरून येळावी गावच्या दिशेने निघून गेला. घडल्या प्रकाराची दिवसभर तासगाव शहरात चर्चा सुरू होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!