रिपोर्टर किशोर लोंढे
पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक १४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाच दिवसीय हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
डॉ रवि शेजाळ यांच्या हस्ते शिबिराचे पहिल्या दिवशी उद्घाटन करण्यात आले.यावेळी सरपंच व शिक्षक व SMC पदाधिकारी उपस्थित होते
शिबिरातील पाच दिवसांचे उपक्रम :
🔹 पहिला दिवस : शिबिर उद्घाटन व कथाकथन
🔹 दुसरा दिवस : गायन व मैदानी खेळ
🔹 तिसरा दिवस : नृत्य व कला
🔹 चौथा दिवस : ओरिगामी, क्रोश वर्क व आरोग्यविषयक उपक्रम
🔹 पाचवा दिवस : फनी गेम्स, प्रदर्शन व समारोप
या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गायन, नृत्य, कथाकथन, मैदानी खेळ, कला व हस्तकला अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. तसेच त्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळाली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणारे शिक्षक व शिक्षिका.
मुख्याध्यापक श्री. रघुनाथ बोदगिरे, श्री. चंद्रकांत लाड, श्री. संजय साबळे, सौ. माधुरी मनगिरे, सौ. सुरेखा दोडमिसे, सौ. सुनीता कोळी व सौ. सारिका शेजाळ यांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत लोंढे, उपाध्यक्षा सौ. संजना चंदनशिवे, सदस्या सौ. वनश्री देसाई, सदस्या सौ. प्रिती कांबळे, सदस्य श्री. विनोद पाटोळे तसेच पालक श्री. भाऊसो चंदनशिवे उपस्थित होते.
विशेष कौतुक व मनःपूर्वक आभार
सुट्टीच्या दिवसांतही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळ देऊन मेहनत घेणाऱ्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे मनःपूर्वक आभार!
तसेच शिबिरासाठी वेळ देणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य आणि सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांचेही विशेष अभिनंदन!
शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पकतेला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे व्यासपीठ आहे.
अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे हिंगणगावच्या शाळेची शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचाल अधिक समृद्ध होवो, हीच सदिच्छा
सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
