रिपोर्ट किशोर लोढे
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते नवी मुंबई महानगरपालिका नेरुळ रुग्णालय येथे अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळेचा शुभारंभ, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी खासदार डॉ.संजीव नाईक, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी महापौर श्री.जयवंत सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये दुस-या मजल्यावर अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा स्थापित करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा उभारणीसाठी मे. आदित्य बिर्ला फाऊंडेशन यांच्यामार्फत प्राईड इंडिया संस्थेच्या सहयोगाने रु.80 लक्ष इतका सीएसआर निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही प्रयोगशाळा रुग्णांच्या क्लिनिकल व्यवस्थापनात आणि साथरोगाच्या अभ्यासात अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
मायक्रोबायलॉजी लॅबमुळे रोगास कारणीभूत ठरणा-या जीवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी यासारख्या सूक्ष्म जीवांची ओळख केली जाऊन संसर्गजन्य रोगाचे अचूक निदान केले जाते व योग्य प्रतिजैविक उपचार सुरू करणे शक्य होते. तसेच रोगाचे लवकर निदान करणे आणि त्याचा प्रसार थांबविणे शक्य होते. त्यामुळे विशेषत्वाने साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्याकरिता मायक्रोबायलॉजी लॅब महत्वाची ठरते. पीजीआयएमएस च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिजैविके सुरू करण्यापूर्वी कल्चर सेंसिटिविटी टेस्ट्स करणे आवश्यक असते, तसेच इन्फेक्शन कंट्रोल कमिटीच्या च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कल्चर स्वॅब टेस्ट करणे शक्य होते.
याठिकाणी ब्लड कल्चर एंड सेंसिटिविटी टेस्ट्स, बॉडी फ्लुइड कल्चर अँड सेंसिटिविटी टेस्ट्स, स्पुटम कल्चर एंड सेंसिटिविटी टेस्ट्स, यूरिन कल्चर अँड सेंसिटिविटी टेस्ट्स, स्टूल कल्चर अँड सेंसिटिविटी टेस्ट्स, पस स्वॅब कल्चर सेंसिटिविटी टेस्ट्स, फंगल कल्चर, आरटी-पीसीआर टेस्ट्स फॉर कोविड अँड स्वाइन फ्लू, एलिसा टेस्ट फॉर एचआयव्ही, एचसीव्ही, एचबीएसएजी आदी विविध महत्वाच्या चाचण्या केल्या जातात. यावेळी मंत्रीमहोदयांसह मान्यवरांनी केमोथेरपी वॉर्ड तसेच कॅन्सर रजिस्ट्री व तपासणी विभागाचीही पाहणी केली. नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी महानगरपालिकेच्या वतीने सुरू केल्या जाणा-या आधुनिक आरोग्य सुविधांची मंत्रीमहोदयांनी प्रशंसा केली.
अशाप्रकारे नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणा-या नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम व गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक करणारी मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा आहे अशी माहिती वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली. यासारख्या सुविधेचा शुभारंभ संपन्न होत असतांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
