रिपोर्ट - अतुल काळे
सांगली/तासगांव भारताचे संविधान हे सामान्य नागरिकासाठी लिहिले गेले आहे, कारण तोच या देशाचा खरा मालक आहे. संविधान हि सामान्य माणसाची आचारसंहिता आहे. संविधानाने जसे आपल्याला हक्क दिले आहेत तशीच आपली काही कर्तव्ये सुद्धा दिली आहेत. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि स्वावलंबी भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक मिलिंद सुतार यांनी केले. तासगाव येथील आबासाहेब गरवारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तासगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे प्रशिक्षक एस. आय. मुजावर, प्रभारी प्राचार्य मुल्ला, अजिंक्य मोटे, अ. भा. वि. परिषदेचे सांगली जिल्हा संयोजक सिद्धार्थ जाधव, आदी उपस्थित होते. श्रीमती टी. व्हि. पाटील यांनी संविधाना मधील उद्देशिका सर्वाना म्हणायला सांगितली व संविधानाप्रमाणे वागण्याची शपथ दिली. संस्थेचे प्रशिक्षक ए. आर. शेडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
