भारतातील सर्वाधिक प्रमाणात माल निर्यात होणारे जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस, न्हावा शेवा येथे विविध सीएफएस जसे जेडब्ल्यूआर, डीआरटी कोनेक्स, नवकार, सर्वेश्वर, स्पीडी या प्रमुख सह सर्व सी.एफ.एस तसेच पार्किंग प्लाझा येथे सध्या निर्यात प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण होत होते आपल्या शिष्टमंडळाने क्लस्टर एक दोन आणि तीन येथील सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निर्यात माल तपासणीसाठी दिवसातून दोन फेऱ्या घेण्याचे निर्देश दिले आहेत अनेक अधिकारी सकाळी नियोजित वेळेत हजर न राहता दुपारी बारा ते एक नंतर कार्यालयात येतात ज्यामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनात श्री.दत्ताभाऊ पुजारी यांनी आणून दिली.
सर्व सीएफएस पार्किंग प्लाझा सीमाशुल्क कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली बसवण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी ज्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजावर सतत देखरेख ठेवता येईल डी आर टी बजेट सीएफएस येथील अधीक्षक श्री झाला यांच्या संदर्भात दिनांक ३/१०/२०२५ रोजी सादर केलेल्या तक्रारीची तातडीने चौकशी करून आवश्यक शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी कारण त्यांच्या विलंबपूर्व वर्तनामुळे निर्यात प्रक्रियेत जाणून-बुजून अडथळे निर्माण होत आहेत सर्व सीएफएस मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, टॉयलेट साफसफाई नाही, सीएफएस मध्ये इन्व्हॉस लवकर मिळत नाही, ॲम्बुलन्स ची सोय नाही, बसण्याची सुविधा नाही, मर्यादेपेक्षा जास्त कंटेनर असल्यामुळे ग्राऊंडींग लोडिंग वेळेवर होत नाही, कॅन्टीनची सुविधा नाही या संदर्भात उचित कार्यवाही व्हावी या सर्व वरील मागण्यांच्या संदर्भात त्वरित योग्य कारवाई व्हावी आपण या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून निर्यात प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकांवर कठोर आणि शिस्तभंगाची कारवाई करावी असे मत यावेळेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना निरीक्षक मुंबई ठाणे रायगड चे श्री दत्तात्रेय मुरलीधर पुजारी आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मराठी कामगार सेना श्री जयसिंग बळवंत पाटील यांनी केले यावेळेस शेकडो कामगार उपस्थित होते.
