तुर्भे विभागातील, तुर्भे जनता मार्केट या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अपंगांना स्टॉल वाटप करण्यात आले होते. या ठिकाणी काही प्रस्थापित गुंडांमुळे संपूर्ण जनता मार्केटला त्रास होत आहे, परंतु याकडे तुर्भे विभाग अधिकारी व अतिक्रमण तुर्भे विभागातील संपूर्ण विभाग व पोलीस विभाग यांचा पूर्णपणे काना डोळा आहे. तसेच या ठिकाणी महीला, लहान मुलांना व वयोवृद्धाना चालण्यासाठी सुद्धा भरपूर त्रास होत आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा होत आहे. आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या वेळेस कोणी अज्ञात इसमाने या ठिकाणी अपंगांच्या स्टॉलला आग लावली. त्यामध्ये अपंगांचे ९ स्टॉल पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत.
गरीब गरजू हाता वरचे पोट असणाऱ्या अपंगांच्या स्टॉलला आग लावलेल्या त्या समाजकंटकांला पोलिस प्रशासन लवकरात लवकर कारवाई करुन बेड्या ठोकतील हीच आशा करता येईल, त्यामुळे नवी मुंबईमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही. अशी परिस्थिती व असा प्रश्न सर्व जनता मार्केट विचारत आहे.
तसेच या ठिकाणी हप्ते घेऊन परप्रांतीयांना व बाहेरील लोकांना धंदे करण्यास अतिक्रमण तुर्भे विभाग, नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासन त्यांच्याकडून सूट मिळत आहे का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
त्यामुळे तुर्भे विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे व पोलीस प्रशासनातील अधिकारी यांचे निलंबन झालेच पाहिजे अशी मागणी यापुढे अपंगांच्या संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे व भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
