माजी आमदार सुमनताईंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीची भव्य पदयात्रा : निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

बृज बिहारी दुबे
By -

 रिपोर्ट अतुल काळे 

सांगली/तासगाव : नगरपरिषद निवडणुक प्रचार शुभारंभादिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट) कडून भव्य पदयात्रेने दमदार शक्तिप्रदर्शन केले. माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथून पदयात्रेला सुरुवात झाली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रा गणपती मंदिर येथे पोहोचली. गणपती मंदिर येथे प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. श्रीराम मंदिर सिद्धेश्वर रोड, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या चरणी उमेदवारानी नारळ वाढवला. दरम्यान आमदार रोहित पाटील यांची प्रकृती बिघडल्याने पदयात्रेस्ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली. मात्र सोमवार दि. 24 पासून ते पुन्हा प्रचारात सक्रिय राहतील अशी माहिती राष्ट्रवादी कडून देण्यात आली.

  आमदार अनुपस्थित असताना प्रचाराची संपूर्ण धुरा माजी आमदार सुमनताई आर.आर. पाटील यांनी समर्थपणे सांभाळली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वासंती बाळासाहेब सावंत आणि पॅनलमधील सर्व 24 उमेदवारांसह निघालेल्या पदयात्रेला महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी सुमनताई म्हणाल्या, तासगाव परिवर्तनासाठी सज्ज आहे. तुतारीच्या उमेदवारांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सोमवारपासून  प्रचार मोहीमेला आणखी गती मिळेल. 

     सिद्धेश्वर मंदिर येथे पदयात्रेची सांगता झाली. कार्यकर्ते पदयात्रा संपवून निघाले. यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील सिद्धेश्वर रोड वरून मार्गस्थ होत असताना त्यांनी गाडी थांबवली. प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार एम. बी. पवार यांच्याशी चर्चा केली. प्रचाराबाबत त्यांनी माहिती घेतली. आमदार रोहित पाटील यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली व पुढे मार्गस्थ झाले. 

     या प्रचार शुभारंभास अविनाश पाटील, सुरेश पाटील, ॲड. गजानन खूजट, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!