नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीतील जनतेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा मिळत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण नवी मुंबई महानगरपालिका झोपडपट्टीतील जनते जवळुन मोठ्या प्रमाणात कर वसूल करते परंतु सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे.
झोपडपट्टीतील जनतेला मुलभूत गरजा साठी देखील संघर्ष करावा लागतो.
शाळा आहे परंतु सुविधांचा अभाव.
पहिला पहिली ते दहावी इंग्रजी माध्यम ची शाळा नाही.
गरोदर महिलांसाठी माता बाल रुग्णालय नाही.
लहान मुलांसाठी युवकांसाठी मैदान अथवा उद्यान नाही त्यामुळे शारीरिक व मानसिक विकास कसा होणार.
आजही पाणी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गढुळ व दुर्गंध युक्त येते अशी तक्रार होत असते.
तसेच झोपडपट्टीतील रस्ते खड्डे मय झाले आहे त्यामुळे जनतेला हा प्रश्न पडतो की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यामध्ये रस्ता आहे.
साधी स्मशानभूमी देखील नाही.
त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीतील जनता नवी मुंबई महानगरपालिकेवर नाराज आहे.
