रिपोर्ट किशोर लोंढे
तुर्भे स्टोअर, नवी मुंबई दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी येथे दुपारच्या वेळी नवजीवन हायस्कूलच्या गेटच्या शेजारी बाथरूम मध्ये एका व्यक्तीची हत्या झाल आहे, त्या जागेवरून दारूची बाटली भेटलेली आहे. तसेच तुर्भे विभागामध्ये संबंधित अजुन कोणी अज्ञात राजकीय व्यक्तीच्या जवळच्या कडून हत्याकांड घडवले गेलेले आहे, अशी चर्चा नागरिक करत आहेत,
नवजीवन शाळेमध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग, कर्मचारी त्याच मार्गाने ये-जा करत असतात. त्यामुळे तेथील वातावरण भयभीत झाले असल्याचे चर्चा आहे.
त्या ठिकाणी तुर्भे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. तसेच काही तासांतच पोलिसांनी २ गुन्हेगारांना अटक केली व यापुढची चौकशी सुरू आहे व यामध्ये अजून कोणी असल्यास त्याला ही कायद्याने अटक व पुढील कारवाई करण्यात येईल व कोणत्याही अफवांवर विस्वास ठेवू नये अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.
