वाशी, नवी मुंबई. दि.०७/११/२०२५.घणसोली येथील रिक्षाचालक संतोष शिर्के यांना रिक्षामध्ये एका प्रवाशाची १२ तोळे सोनं आणि कपड्यांची बॅग सापडली. कोणतीही लालसा, अपेक्षा आणि स्वार्थ न बाळगता त्यांनी ती बॅग वाशी पोलीस ठाण्यात जमा केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र नरोटे यांच्या उपस्थितीत ती बॅग मालक संतोष मोतलिंग यांना परत करण्यात आली.
बॅग परत मिळाल्यानंतर, संतोष मोतलिंग यांनी आनंद व्यक्त करत प्रामाणिक रिक्षाचालक संतोष शिर्के यांचा सत्कार केला. तसेच रिक्षा चालक-मालक एकता युनियन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अविनाश कदम आणि वाशी पोलिसांनी या प्रामाणिकतेचे विशेष कौतुक केले
