रिपोर्ट किशोर लोंढे
नवी मुंबईतील वाशी सेक्टर १० येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या पालिका रुग्णालय प्रशासनाचे उघड उघड दुर्लक्ष झालेले आहे, दूषित सांडपाण्याची गळती सुरु रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरु आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळील परिसरात दूषित सांडपाण्याची गळती हत आहे. सांडपाणी संपूर्ण दिवसभर रुग्णालयाच्या आवारात वाहत असते, यामुळे रुग्णालयाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी गळती, घाणीचा साठा आणि अपुरी स्वच्छता यांचा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, वारंवार तक्रारी होत असूनही नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल अथवा कारवाई न केल्याने रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या परिस्थितीमुळे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिकांनाही आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या स्पर्धे मध्ये प्रथम, द्वितीय, अथवा तृतीय स्थानावर असते, परंतु नवी मुंबई, वाशी सेक्टर १० या ठिकाणी असलेल्या रुग्णालयामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रुग्णालयामध्ये स्वच्छतेसाठी लाखो रुपये ठेकेदाराला देण्यात येतात, परंतु यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यावर योग्य ती भूमिका व कारवाई करतील अशी आशा नवी मुंबई करत आहेत.
