रिपोर्ट दिपक निगडे.
जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे हा संदेश या चर्चेतून देण्यात आला
दि. २५/१०/२०२५ नवी मुंबई कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.उमेशजी गवळी साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरखैरणे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान नागरिकांच्या अडचणी आणि कायदेशीर संबंधित विषयावर रचनात्मक चर्चा झाली. नवी मुंबई महानगरपालिकेकडून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार छोट्या स्वरूपातील बांधकामांवर दिलेल्या नोटिसा काही नागरिकांवर होणारी पोलीस कारवाई, तसेच कायद्याविषयी नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य या सर्व विषयांवर श्री गवळी साहेबांनी मार्गदर्शन केले आणि जनजागृती केली. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत होणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. सर्व नागरिकांनी कायद्याचा आदर ठेवून जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे हा संदेश या चर्चेतून पुढे गेला. यावेळी सोबत श्री सुरेश शिंदे सौ वैशाली वाळंजकर श्री विठ्ठल मोरे श्री आकाश कोंढाळकर श्री सुयोग बेलुशी श्री दत्तात्रेय धनवडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांच्या हक्काचे रक्षण आणि जबाबदारीची जाणीव हाच आमचा उद्देश्य असा संदेश यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिपक बदक यांच्या माध्यमातून देण्यात आला.
