दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी तुर्भे स्टोअर नवी मुंबई ईथे कुमार. चंदन सिंग याने वाट्सएप स्टेटस / पोस्ट द्वारे विश्वरत्न भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर आक्षेपार्ह वीडियो अपलोड केला, व्हिडियो मध्ये एक इसम असे बोलतो की बाबासाहब ने संविधान नही लिखा, बी एन राव ने संविधान लिखा बाबासाहब अंग्रेजो का दलाल और एजेंट था या वर त्या कैप्शन मध्ये लिहले होते. इस बात से १००% (प्रतिशत) सहमत हूँ. सदरिल स्टेटस आयु. विकास गवई, मोहित लगाडे यांनी पाहिला, लगेच त्यांनी चंदन याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही, त्यानंतर विकास गवई यांनी त्यांच्या बहनीशी संपर्क साधला व संपर्क झाला नाही. त्यामुळे विकास गवई हे चंदन च्या राहत्या घरी गेले व विचारपुस करू लागले, विचारपुस करते वेळेस चंदन सिंग घरात स्वतःला कडी लावून बसले होते. त्यांनी घराच्या बाहेर येण्याची विनती केली. तरी देखील चंदन चा काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदरिल घटना १०० नंबर वर कॉल करून पोलिस चौकी ला सांगण्यात आली. पोलिस चंदन सिंग यांना राहत्या घरून पोलिस चौकी मध्ये दाखल केले. सदरिल घटना संपूर्ण तुर्भे विभागामध्ये पसरल्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली. त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनता तुर्भे एम आय डि सी पोलिस स्टेशन मध्ये जमा झाली व एट्रोसिटी (SC/ST) कायदा १९८९ अंतर्गत कु.चंदन सिंग याच्यावर फिर्याद दार विकास गवई यांनी अनुसूचित जाती | जमाती (SC/ST Act) कायदया द्वारे गुन्हा दाखल केला. यापूर्वी देखील कुमार. चंदन सिंग याने वाट्सएप स्टेटस / पोस्टवर असे कृत्य केले होते परंतु त्यावेळी पोलिसांनी त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगितले होते, परंतु तरी देखील हा सुधारला नाही.
गुन्हा दाखल करते वेळेस ऍड.सिद्धार्थ हिरोडे ( मुंबई उच्चन्यायलय) आयु. सुरुज वाकळे तसेच सत्यशोधक मैत्री संघा चे अभ्यासक व तुर्भे विभागातील पुरुष व महिला उपस्थित होत्या.