संवाद' ने संजयकाकांचा कार्यकर्ता चार्ज ; स्थानिक स्वराज्यची निवडणूक होणार रंगतदार

बृज बिहारी दुबे
By -

, ( रिपोर्ट अतुल काळे)







सांगली /तासगाव : हा संजय पाटील कुणाला घाबरत नाही. जोर बैठका काढून तयार झालेला मल्ल आहे. मी भिऊन थांबलो नाही, थांबणार नाही. ज्या लोकांनी मला उभा केलं त्यांची अवहेलना करणार नाही. ज्यानी माझं राजकारण उभा केलं त्याची ही निवडणूक. कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी तन मन धनाने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहू. अशी साद सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी घातली. विधानसभा निवडणुकीनंतर अज्ञातवासात गेलेले संजयकाका यांचे मौन सुटल्याने कार्यकर्ता चार्ज झाल्याचे वातावरण दिसून आले. 

     तासगावातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना ते पुढे म्हणाले, 97 साली राजकारणात मोठा संघर्ष केला. समाज हितासाठी काही वेळ सामंजस्याची भूमिका घेतली, याचा कुणी वेगळा अर्थ काढू नये. आपण सगळ्यांनी मला शक्ती दिली, मला मोठं केलं. जनतेनं मला खासदार केलं. मी माझं कर्तव्य करत गेलो. कधी मीपणा केला नाही. राजकारणाचा धंदा केला नाही. कमिशन घेऊन पैसा कमावला नाही. आता लढायचं आहे. पक्ष, पार्टी बघू नका लढायचं आहे हे लक्षात ठेवा. आमदार - खासदारकी भोगली आहे, आता कोणतेही पद नसताना कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी तन मन धनाने लढणार असल्याचा पुनरुच्चार संजयकाका यांनी केला.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ. प्रतापनाना पाटील, प्रमोद शेंडगे, विलास पाटील आदी प्रमुख उपस्थितांची भाषणे झाली तर आर. डी. आप्पा पाटील, बाबासाहेब पाटील, अनिल कुत्ते, तासगाव येथील माजी नगरसेवक, तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील संजय काकांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अद्याप भूमिका अस्पष्टच - संजयकाका पाटील यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला असला तरीही काकांची पक्षाबाबतची भूमिका अद्यापही अस्पष्टच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय नसल्याचे संजयकाकांनी माध्यमांना सांगितले. विकास आघाडी स्थापन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

    नाव न घेता केलेली शाब्दिक टोलेबाजी - कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये भाषण करताना मान्यवरांनी विरोधकांवर टीका करीत असताना नावाचा उल्लेख केला नाही. नाव न घेता केलेली शाब्दिक टोलेबाजी म्हणजे निवडणुकीत एकत्र येण्यासाठी राखून ठेवलेला हातचा असल्याचे बोलले जात आहे. 


    वाहनांची मोठी संख्या - कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. प्रवासासाठी वापरण्यात आलेली वाहने लावण्यासाठी उपलब्ध जागा कमी पडत होती. रस्त्यावर मोठ्या संख्येने दुचाकी उभ्या होत्या. पर्यायाने तासगाव विटा मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. वाहने पार्किंग साठी मागविण्यात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती जाणवत असल्याचे कार्यकर्त्यातून बोलले जात होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!