रिपोर्ट किशोर लोंढे
तुर्भे विभागामध्ये घनकचरा विभाग व अतिक्रमण विभाग नवी मुंबई महानगरपालिके मुळे जनतेचे हाल होत आहेत. घनकचरा विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या माध्यमातून जनतेच्या सर्व कामावर कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेमध्ये या दोन्ही विभागाच्या बद्दल एक अत्यंत विद्रूप असे चित्र तयार झालेले आहे. यावर स्वच्छता अधिकारी जयेश पाटील हे जनतेचा फोन उचलत ही नाहीत व कोणत्याही प्रकारचे उत्तर देखील देत नाही. तसेच तुर्भे अतिक्रमण विभागाच्या बाबत भरपूर प्रमाणात तक्रारी अतिक्रमण उपायुक्त व आयुक्तांना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच यावर विभाग अधिकारी यांचा कानाडोळा होत आहे. अशी चर्चा संपूर्ण तुर्भे विभागामध्ये होत आहे.
ह्या बेकायदेशीर धंद्यावर कोणाच्या सांगण्यावरून कारवाई होत नाही. ह्या कृत्याला खतपाणी घालणारे पालिका प्रशासन सर्वस्व जिम्मेदार आहे. तसेच सागर मोरे यांचे दिलेल्या तक्रारीवर लक्ष नसल्याने तुर्भे विभागामध्ये अतिक्रमण व अनाधिकृत धंदे वाढले आहेत अशी माहिती एक सज्जन नागरिक व तक्रारदार, ॲड. ज्ञानदिप आ. निकाळजे. RPI(A), उपाध्यक्ष नवी मुंबई व दत्तात्रय दिवाने यांनी दिली.
तरी यापुढे आलेल्या तक्रारींवर विभाग अधिकारी सागर मोरे हे योग्य कारवाई करतील व होणारी दुर्घटना व अपघात होण्यापासून रोखण्यासाठी काम करतील.
तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये यावर काम झाले नाही तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब व प्रविण म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
