फलटणमध्ये डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. आपल्या स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहून त्यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. सुसाईड नोटमध्ये PSI गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोन अधिकाऱ्यांवर शारीरिक, मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
ज्या ठिकाणी लाडक्या बहिणीला महाराष्ट्रामध्ये इज्जत भेटत आहे. सरकार त्यांना लाडकी बहीण म्हणून पैसे देत आहेत. त्याच ठिकाणी फलटणमध्ये डॉक्टर महीला बहीणी सोबत हा असा विचित्र प्रकार होत आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आता तर देण्यात येईल का? कारण महाराष्ट्रामध्ये अशा घटना वाढत आहेत असे चर्चा सर्वत्र महाराष्ट्रभर सुरू आहे रक्षकच जर भक्षक होतील तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे..
