रिपोर्ट किशोर लोंढे
संपूर्ण देशातून आरएसएस वर बंदी घालण्याची मागणी होत आहे, तसेच आरएसएस च्या माध्यमातून देशविरोधी कामे होत आहेत, अशी टीका सर्वत्र भारतातून होत आहे. त्याच अनुषंगाने सुजात आंबेडकरांची संघावर बंदीची मागणी केली आहे. यापूर्वी देखील बर्याच वेळा आर एस एस वर बंदी घालण्यात आलेली होती.
आज आरएसएस मुर्दाबादच्या घोषणाणी छत्रपती संभाजी नगर दणाणून गेले होते.
पोलीस प्रशासनाने मोर्चाला कोणाच्या दबावावरून बंदी घातली व मोर्चाला परवानगी नाही दिली, याच्या विरोधात आंबेडकर समाजातील वंचित बहुजन आघाडीतील प्रत्येक कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरलेला होता.
राजकारण करावे परंतु शाळा व कॉलेज या ठिकाणी देखील राजकारण होत असेल आणि आरएसएस आपले चुकीचे मनसुबे या ठिकाणी मांडत असेल आणि आपला प्रचार करत असेल, तर हे चुकीच आहे अश्या माहितीचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये व मोबाईलवर प्रसारित झाला होता. त्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांचा विरोध केला होता व अशा कृत्य शाळा व कॉलेजच्या बाहेर करण्यापासून त्यांना रोखले होते, तसेच आरएसएस च्या कार्यकर्त्यांना तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला होता व कायदा मोडत आरएसएस आपले काम करत आहे. याची तक्रार देखील केली होती, परंतु उलट वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांच्यावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मोर्चात लाखोच्या संख्येने बहुजन समाजातील जनतेने सहभाग घेतला होता व हा मोर्चा प्रशासनाला जागे करण्यासाठी काढण्यात आला होता.
