(रिपोर्ट किशोर लोंढे )
रिक्षा चालक मालक युनियन तुर्भे नाका नवी मुंबई यांच्या वतीने येणाऱ्या सहा ऑक्टोबर २०२५ आंदोलनास जाहीर पाठिंबा, या संदर्भामध्ये आज बैठक संपन्न झाली यावेळी महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी, रिक्षा चालक-मालक संघटना वाशी अध्यक्ष सुनील बोर्डे, भारतीय मीडिया फाउंडेशन नॅशनल डिप्टि चेअरमन महाराष्ट्र राज्य परिवहन फोरम किशोर लोंढे, आगरी कोळी समाजाचे नंदू पाटील, तसेच नागेंद्र यादव यांनी आलेल्या रिक्षा चालक-मालकांना योग्यरीत्या मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या सहा ऑक्टोबर २०२५ रोजी आंदोलनाची रूपरेषा ठरवून दिली. रिक्षा चालक-मालक यांचे दिवसेंदिवस होणारे हाल आणि त्यांच्यावर लादला जाणारा वेगवेगळा अती कर तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची सुविधा न मिळत असल्याबाबत रिक्षावाल्यांचे हालचाल होत आहेत त्यातच ओला, उबेर आणि रॅपीडो सारख्या अँपला परवानगी नसताना देखील सरासपणे बाईक टॅक्सी या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चालत आहेत, नवी मुंबई मध्ये देखील त्याचा जाळ पसरलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी तसेच रिक्षा चालक-मालकांची ज्या काही मागणी आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या सहा तारखेला भव्य दिव्य असा रिक्षा चालकांचा कोकण भवन या ठिकाणी धडक मोर्चा पोहोचणार आहे. तसेच एक दिवशी लाक्षणिक उपोषण सुद्धा तिथे होणार आहे.
सोबत
रिक्षा चालक-मालक संघटना तुर्भे नाका अध्यक्ष लिंगेश धोत्रे, सचिव कादर मुलांनी व इतरही संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा चालक उपस्थित होते.
अनधिकृत ॲपवर तसेच त्यांच्या माध्यमातून चालवलेली बाईक टॅक्सी ही बंद झालीच पाहिजे अशी मागणी सर्व रिक्षा चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून होत आहे.
