(रिपोर्ट किशोर लोंढे)
आज बुधवार दि ८/१०/२०२५ रोजी सायं ५.३० वाजता नेरुळ रेल्वे स्टेशन (पश्चिम) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मानीय श्री शशिकांतजी शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई सर यांच्यावर न्यायालयात एका वकिलाने बुट फेकुन केलेल्या हल्ल्याच्या विरोधात सदर त्या वकिलांची सनद रद्द करुन, त्या दोषी व्यक्ती वर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी. जेणेकरून लोकशाहीत पुन्हा अशा घटना घडणार नाहीत यासाठी निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी नवी मुंबईतील महिला जिल्हाध्यक्ष सलुजाताई सुतार, श्री जी एस पाटील साहेब, सौ प्राजक्ता ताई मोंडकर ,सौ अस्मिता पाटील, सौ साधना बर्गे, सौ शालिनीताई म्हात्रे, पुष्पा कांबळे, सौ जयश्री गोळे, सौ सीमाताई पाटील, लक्ष्मी राठोड, सौ सुरेखा शिंदे, सौ. गीता ताई चापके, सौ श्वेता ताई खरात, सौ मनिषा देसाई, सौ विजया कदम, सौ माधुरी परदेशी, सौ वैशाली वाळुंजकर, सौ आरती नाईकडे, श्री तेजस फणसे, श्री सुरेश शिंदे , श्री गणेश मोंडकर, श्री प्रसाद प्रभाकर भुजबळ, श्री गणेश महादेव भंडगे, श्री मोहन जयवंत लोंढे, श्री विकास ज्ञानेश्वर मुळे, विजय काजरोळकर, श्री अशोक सूर्यवंशी, श्री जितेंद्र कोळी, श्री नरेश कालेकर, नरेश गोविंद, उमेश गायकवाड, बाळासाहेब जरे, सुयोग बेलोशे व इतर ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
