(रिपोर्ट किशोर लोंढे)
अतिक्रमण विभाग ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. त्यांनी यापूर्वी अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजित कदम यांच्याकडून १० लाख रुपये स्वीकारले होते. तसेच आत्ताच त्यांना २५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सायंकाळी ६:५० वाजेपर्यंत, एसीबीचे अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये उपस्थित आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र सांगळे आणि त्यांच्या पथकाने हा सापळा यशस्वीरित्या पार पाडला. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका येथे देखील अशी कारवाई होण्याची शक्यता आहे अशी कुजबूज जनतेमध्ये होत आहे.
