रिपोर्ट अतुल काळे
सांगली /तासगाव : गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेल्या 11 मोबाईलचा तासगाव पोलिसांनी शोध लावून सदर मोबाईल ज्याचे त्याला परत देण्याची कामगिरी तासगाव पोलिसांनी चोख बजावली. याबाबत मोबाईल धारक आणि नागरिकातून तासगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.
तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच तासगाव शहरातील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी आल्याने तासगाव पोलिसांनी तपासात तत्परता दाखविली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड आणि तासगावचे नूतन पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरज जगदाळे, योगेश जाधव, अजय बेंद्रे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील (सायबर सेल सांगली) यांनी शोध मोहीम राबवत गहाळ मोबाईलचा शोध लावला. अनिकेत पाटील- पुणदी, सुरज शिर्के - तासगाव, संदीप जाधव- चिंचणी, अभिषेक लोखंडे- मिरज, मीनाक्षी शिंदे- अंजनी, आसिफ मगरे - सांगली, विठ्ठल चव्हाण- सिद्धेवाडी, प्रमोद पाटील- वायफळे, नितीन खरमाटे- वंजारवाडी, प्रकाश माळी- येळावी, विकास बाबर- चोपडी (सांगोला) अशा 11 जणांना मोबाईल परत करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तपास करत मोबाईल शोधण्यासाठी तपास पथकाला मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्व थरातून कौतुक होत आहे.
