उत्तम दिघे यांच्या हस्ते जलतारा खड्ड्यांचे उद्घाटन

बृज बिहारी दुबे
By -

सांगली/तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथे सेवा पंधरवडा अंतर्गत रोजगार हमी योजनेतर्फे गावातील भूजल पातळी सुधारण्यासाठी जलतारा खड्ड्यांचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमाद्वारे पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाईल, ज्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीने बागायत पिकांना मोठा लाभ मिळणार आहे. सावर्डे गावात सुमारे 200 पेक्षा जास्त जलतारा खड्डे काढण्याचे प्रस्ताव आलेले असून आतापर्यंत जवळपास 40 खड्डे पूर्ण झाले आहेत. अशी माहिती तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.
    यावेळी प्रशासकीय अधिकारी, सावर्डे येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




रिपोर्ट अतुल काळे 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!