महिलांनी कौशल्य आत्मसात करून आर्थिक साक्षर व्हावे - स्मिता पाटील

बृज बिहारी दुबे
By -
     (  रिपोर्ट अतुल काळे)

सांगली/तासगाव : उद्योगधंदा करताना यशस्वी व्यक्तींनी कसा संघर्ष केला हे तपासावे. विद्यार्थिनींनी आणि महिलांनी कौशल्य आत्मसात करून आर्थिक साक्षर व्हावे असे उद्गार सीए स्मिता पाटील यांनी पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि महिला सक्षमीकरण आणि जेंडर इक्वलिटी सेल च्या वतीने आयोजित केलेल्या 'सक्षमता ते स्वावलंबन कौशल्य, व्यवसाय आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग ' या विषयावर बोलताना काढले. त्या पुढे म्हणाल्या करिअर निवडताना स्वतःला कशात आवड आहे हे पहा ,आत्मपरीक्षण करा, व्यवसायिक करिअरच्या संधी शोधा , आपल्या क्षमता तपासा , ए आय चा अभ्यास करा भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल.सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. स्पर्धा कमी असलेले व्यवसाय निवडण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्याचबरोबर स्टार्टअप आणि MSME उद्योग उभारणीसाठी लागणारी कायदेशीर प्रक्रियेचा सविस्तर खुलासा केला
        अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी महिलांनी संवाद कौशल्य आत्मसात करून व्यवसायात यश मिळवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पल्लवी मिरजकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय महिला सबलीकरण विभागाच्या समन्वयक डॉ. श्रुती परचुरे यांनी करून दिला.आभार प्रा.प्रगती जाधव यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वर्षा जगदाळे आणि प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव यांसह महाविद्यालयातील महिला प्राध्यापक नेहा मोरे, डॉ. ए एस मगदूम, डॉ. निशा देसाई, प्रा. पूनम पाटील, प्रा. मेघा पवार व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!