शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती युवा महोत्सवात पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयाचे यश

बृज बिहारी दुबे
By -

        रिपोर्ट - (अतुल काळे )

सांगली/तासगाव : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे शिवाजी विद्यापीठाचा ४५ वा मध्यवर्ती युवा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवात तासगावच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाने प्रहसिका (लघु नाटिका) या कला प्रकारात पाचव्या क्रमांकाचे यश प्राप्त केले. इस्लामपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात या कलाप्रकाराला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले होते. यामधे शुभम कोळी, कु.गौरी कुंभार,कु.साक्षी शिंदे, शेखर माळी कु.जुई पळसे, कु.सृष्टी पाटील आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता. 
    महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद हुजरे यांची प्रेरणा व सांस्कृतिक विभागाचे सहकार्य व मार्गदर्शन यामुळेच मध्यवर्ती व महोत्सवात महाविद्यालयाने प्रथमच यश संपादन केले. या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसंस्थेचे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!