सांगली/तासगाव : “मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडाजगताचे खरे रत्न होते. त्यांची खेळातील कसब, शिस्त आणि समर्पण आजच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे, असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा,कारण खेळ आपल्यात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक धैर्य आणि नेतृत्वगुण निर्माण करते. सांगली प्रीमियर लीग महिला क्रिकेट संघात सांगली चाम्पस मध्ये कु.संस्कृती शिवाजी राठोड तर सांगली वॉरियर्स मध्ये कु.संसज्ञा रविंद्र माने हिची निवड झाली. त्यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडासंचालक प्रा.ए.के. पाटील यांनी केले तर आभार कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ.साईनाथ घोगरे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, खेळाडू, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट अतुल काळे