सांगली/तासगाव : गणपती पंचायतन तासगावचा ऐतिहासिक रथोत्सवानिमित्त तासगाव शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात येत असून नागरिक व वाहनधारकानी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.
तासगावचा प्रसिद्ध रथोत्सव गुरुवार दिनांक 28 रोजी संपन्न होत आहे. रथोत्सवादरम्यान नागरिक भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. लहान मुले,स्त्रिया, पुरुष यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यावेळी कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरिकांचे जीवितास धोका पोहोचू नये याकरिता पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये दि. 28 रोजी रात्री 00:01 ते 24:00 तासगाव शहरातील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल करण्यात येत आहे.
सांगली, मणेराजुरी कडून विटा आटपाडी कडे जाणारी वाहने कॉलेज कॉर्नर - बायपास मार्गे भिलवडी नाका -एसटी स्टँड -विटा नाका मार्गे पुढे रवाना होतील. विट्याहून सांगली कडे जाणारी वाहतूक विटा नाका- चिंचणी नाका- चिंचणी चौक- थळेश्वर मंदिर चिंचणी-मणेराजुरी हायवे-कॉलेज कॉर्नर तासगाव -मार्गे सांगली कडे. आटपाडी हून सांगली कडे जाणारी वाहने पुणदी फाटा - वाघमोडे वस्ती-चिंचणी चौक थळेश्वर मंदिर चिंचणी-मणेराजुरी हायवे -कॉलेज कॉर्नर तासगाव -मार्गे सांगली कडे रवाना होतील. आटपाडी होऊन भिलवडीकडे जाणारी वाहने पुणदी फाटा - वाघमोडे वस्ती - चिंचणी- थळेश्वर मंदिर चिंचणी- मणेराजुरी हायवे-कॉलेज कॉर्नर तासगाव- बायपास मार्गे जिजामाता चौक अशी भिलवडी कडे रवाना होतील. सदरचा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून वाहतुकीस अडथळा आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे सांगली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
रिपोर्ट अतुल काले