रिपोर्ट किशोर लोंढे
कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि एका पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.
न्याय देण्याची, कायदा राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी जर लाच घेताना पकडले जात असतील, तर सामान्य नागरिकाने विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.
ACB कडे एका नागरिकाने तक्रार केली होती की, पोलिस अधिकारी त्याच्याकडून लाच मागत आहेत. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून पैसे घेत असताना दोघांना पकडण्यात आले. या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.
अशा घटना पाहून लोकांमध्ये संताप पसरला आहे. पोलीस विभागात प्रामाणिक अधिकारीही आहेत, पण काहींच्या भ्रष्ट वागणुकीमुळे संपूर्ण यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत होतो. भ्रष्टाचाराविरोधात ACB सारख्या विभागाचे काम कौतुकास्पद आहे आणि नागरिकांनीही अशा घटनांविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणे गरजेचे आहे. अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
