रिपोर्ट किशोर लोंढे
क्रिकेटमध्ये आपण अनेकदा “हॅट्रिक” हा शब्द ऐकतो, पण आता हा शब्द राजकारणातही लोकप्रिय होताना दिसतोय.
विशेषत नवी मुंबईतील राजकारण IPL पेक्षाही अधिक रंगतदार होत चालले आहे. अशी चर्चा सध्या स्थानिक राजकीय वर्तुळात जोरात आहे.
आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ पाडव्याच्या शुभ संध्येला, सीवूड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे.
भगत साहेबांच्या संघटनात्मक कार्यशैलीने व सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेल्या जवळिकीमुळे नवी मुंबईत पक्षाचा प्रभाव सातत्याने वाढत असून, सलग आता ही (हॅट्रिक) नवीन कार्यकर्त्यांचा मोठा प्रवेश झाला आहे.
या निमित्ताने नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यात नवचैतन्य निर्माण झाले असून, येत्या स्थानिक निवडणुकांत या संघटित शक्तीचा मोठा प्रभाव पडणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जातो.
