कुर्ला, मुलुंड मुक्ताई ब्रिगेडने बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुक्ताई ब्रिगेडच्या माध्यमातून मंगळवारी १४/१०/२०२५ रोजी मुलुंड येथे तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मुक्ताई ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा सौ, ज्योतीताई क्षिरसागर आणि आदरणीय मा.स.श्री.विजयजी क्षिरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड रेल्वे स्टेशन येथून संवेदनशील मार्गाने सुरू झालेल्या या मोर्चाला मुक्ताई ब्रिगेडचे पदाधिकारी कैसर जहा अन्सारी (मुंबई प्रदेश अध्यक्ष) मुंबई संघटन दिनेश राजभर, भीमराव कांबळे, महिपती घाटे, जयवंती खोत, शिल्पा मॅडम, कल्पना पात्रे, नीलफोर शेख, गोदावरी कसबे, नाजराबाई अन्सारी, विजय साळवे, दिपक निगडे, धर्मदेव ठाकूर, सत्यभामा दहांडे इत्यादी पदाधिकारी व शेकडो संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले होते. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, बहुजनो के सन्मान में मुक्ताई ब्रिगेड मैदान मे, नारी के सन्मान में मुक्ताई ब्रिगेड मैदान मे, महापुरुषो के सन्मान में मुक्ताई ब्रिगेड मैदान मे, संविधान के सन्मान में मुक्ताई ब्रिकर मैदान मे, पोलीस के सन्मान में मुक्ताई ब्रिगेड मैदान मे, अशा प्रकारच्या गगनभेदी महापुरुषांच्या घोषणांनी मुक्ताई ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
मातंग समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आठ टक्के आरक्षण देऊन अ,ब,क, ड, वर्गवारी करण्यात यावी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ पाच लाख रुपये कर्ज थेट महामंडळातून देण्यात यावे, संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचे पेन्शन योजना यातील जाचक अटी रद्द करून बिना अटी पेन्शन देण्यात यावी, निराधारांच्या पगारी झाल्या पाहिजे, सर्व जातीत धर्मातील लोकांना पहिली ते पदवीधर पर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात यावे, महिलांना स्वरक्षणाकरिता हत्यार बाळगण्याची परवानगी द्यावी, क्रांती सम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या नावे समाज गौरव पुरस्कार सुरू करण्यात यावा व त्यांचे तैलचित्र साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यालयात लावण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन (कुर्ला मुलुंड) तहसीलदार श्री दिलीप रायण्णावर साहेब यांना देण्यात आले याच्यावर आम्ही लवकरात लवकर उपाययोजना चालू करू असेत्यांनी म्हंटले आहे. तरीसुद्धा मुक्ताई ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा सौ ज्योतीताई क्षिरसागर आणि आदरणीय मा. स. श्री. विजयजी क्षिरसागर साहेब यांनी आपण लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अन्यथा मुक्ताई ब्रिगेडच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन घडवण्यात येईल आणि बहुसंख्येने रस्ता रोको आंदोलन सुद्धा छेडण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला. असा इशारा मुक्ताई ब्रिगेडच्या अध्यक्षा यांनी दिला
