भोर तालुक्यातील शेतजमिनींची अवैध खरेदी-विक्री वाढली; प्रहार जनशक्ती पक्षाची तहसीलदारांकडे तक्रार पुणे भोर

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट.  दिपक निगडे)

 भोर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर एजंटांकडून ब्लॅकमध्ये विकत घेतल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत या प्रकरणामुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून प्रहार जनशक्ती पक्षाने यावर गंभीर आक्षेप घेतला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका उपाध्यक्ष सचिन नवघणे शाखा अध्यक्ष हनुमंत सुतार तसेच एडवोकेट चंद्रकांत चिकणे आणि सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा तुपे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या जमिनींच्या अवैध खरेदी-विक्रीला आळा घालावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे भोर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांच्या जमिनी खरेदी विक्री ठरावा तालुक्यातील ग्रामपंचायततिने तहसीलदार यांच्याकडे द्यावा तहसीलदार प्रांतअधिकार ने नोटीस देऊन ठरावाचा पाठपुरावा करावा तसेच ठराव देऊन सुद्धा खरेदी विक्री व्यवहार बिना ठराव झाला तर याच प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी शाखा अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी बोलताना सांगितले निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही पाठवण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखावी आणि दलाल महाजनांच्या मनमानीला आळा घालावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने यावेळेस  केली आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!